लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : दुष्काळाची परिस्थिती असतांनाही साक्री तालुक्याला वगळण्यात आले आहे़ मात्र साक्री तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी नागपूर-सुरत राष्टÑीय महामार्गावर शिवसेनेकडून गुरूवारी सकाळी रास्तारोको करण्यात आला़ शासनाने धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यांचा समावेश केला. मात्र, साक्री तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात नुकसान होऊनही या तालुक्यास वगळला़ दरम्यान, प्रशासनाने साक्री तालुक्याचा दुष्काळात समावेश न केल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय झाला आहे़ साक्री तालुक्याला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले़ यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, विशाल देसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते़
साक्रीनजिक महामार्गावर शिवसेनेचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:54 PM
दुष्काळी जाहीर करा; शिवसेनेची मागणी
ठळक मुद्देनागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोकोदुष्काळ जाहीर करण्याची एकमुखी मागणी