लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाच्या विकास निधीतून पांझरा नदीकिनारी रस्त्याचे काम सुरु आहे़ या कामाच्या ठिकाणी शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला़ त्यामुळे विकास कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यासह १०० जणांविरुध्द आमदार अनिल गोटे यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनला शनिवारी पहाटे २ वाजता गुन्हा दाखल केला़ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष अनुदानातून पांझरा नदीच्या दोनही बाजुला साडेपाच-साडेपाच किमी लांबीच्या रस्त्याचे काम सुरु आहे़ देवपुरातील नदीच्या उत्तर भागाकडील रस्त्याचे जवळपास काम पुर्णत्वास येत आहे़ केवळ न्याय प्रविष्ट असलेल्या जयहिंद जलतरण तलावाचे काम अपुर्ण आहे़ नदीच्या दक्षिणेकडे जुन्या धुळ्यातील काही भागात सरकारी जमिनीवर अतिक्रमणामुळे मोठा अडसर निर्माण होत आहे़ शासकीय कामात अडथळा आणला जात आहे़ तसेच या ठिकाणी वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली़ काम करणाºया कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली़ याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, रविंद्र माळी, भावश्या माळी, महेश माळी, राज माळी आणि १०० जणांसह पोलीस कर्मचारी कैलास पाटील यांच्याविरोधात आमदार अनिल गोटे यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़
शिवसेना जिल्हा प्रमुखांवर आमदारांकडून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:59 PM
विकास कामात अडथळा : दगडफेकीने तणाव
ठळक मुद्देविकास कामात अडथळा आणल्याचे कारणआमदार अनिल गोटेंनी दाखल केला गुन्हाराजकीय क्षेत्रात खळबळ