धुळे: लोकसभा मतदार संघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांना उमेदवारी देवू नये अशी मागणी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली आहे़ पत्रकात भामरे यांच्या कार्यपध्दतीवर टिकाही करण्यात आली आहे़ शिवसैनिकांनी भामरे यांना भरभरुन प्रेम दिले आहे़ सेना भामरेंसाठी झटली़ गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदार संघातून २ लाख मते डॉ़ भामरेंना मिळवून देण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे़ डॉ़ भामरे केंद्रात मंत्री होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला होता़ परंतू भामरे व भाजपा जिल्हाध्यक्ष या जोडगोळीने महानगर पालिकेच्या निवडणुकीत उच्छाद मांडला़ पैशांचे आणि सत्तेचे आमिष दाखवून शिवसैनिकांना गळाला लावले असा आरोपही करण्यात आला़ नेत्यांच्या आदेशाखातर आम्ही सर्व विसरायला तयार होतो, केवळ उमेदवार बदलण्याची अट होती़ ती गैरवाजवी नव्हती़ डॉ़ भामरे हे मतदार संघात टक्केवारीच्या आरोपामुळे बदनाम असल्याची परखड टिका शिवसेनेचे लोकसभा संघटक महेश मिस्तरी, प्रथम महापौर भगवान करनकाळ, मिलींद मुंदडा, माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी, उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली़डॉ़ सुभाष भामरे यांना उमेदवारी देऊ नये अशी त्यांची इच्छा आहे़ पण, आम्ही युतीचा धर्म निभावू़ यासंदर्भात जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहे़ बुधवारी मालेगावमध्ये भाजपा-सेना युतीचा मेळावा होत आहे़ या मेळाव्यात सर्व शिवसैनिक येतील, असा मला विश्वास आहे़-अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष, भाजपानंदुरबारमध्ये रूसवे फुगवे काढण्यात भाजपाची आघाडीनंदुरबार मतदार संघात मित्र पक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांच्यातील रूसवे फुगवे काढण्यास भाजपाने आघाडी घेतली आहे. तसेच नाराजी दूर करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेवून यापूर्वीच निवडणूक काळात एकत्रपणे काम करण्याचे जाहीर केले आहे.
धुळ्यात भामरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:15 AM