शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शिवसेनेचा स्वबळाचा निर्णय फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:03 PM

शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख घसरता कायम

ठळक मुद्देशिवसेनेला ७४ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत.मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही.२०१८च्या निवडणुकीत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही.

अतुल जोशी। आॅनलाइन लोकमतधुळे : महापालिकेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढणाºया शिवसेनेला यावेळी दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. त्यांचा स्बळाचा निर्णय फसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच  लोकसंग्राम पक्षाने पाठिंबा देवूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.  २००३ वगळता महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीतही शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख घसरता कायम राहिला आहे.यापूर्वी झालेल्या महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने भाजपासोबत युती करूनच लढविली. मात्र आगामी काळात होणाºया लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने भाजपापासून फारकत घेत स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे स्पष्ट झाले.स्बळावर निवडणुकीला सामोरे जाणाºया शिवसेनेला ७४ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. त्यांना फक्त ४८ जागांवरच उमेदवार उभे करता आले. मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ संपर्क प्रमुख के.पी.नाईक हे आठवडाभर शहरातच ठाण मांडून होते. तर उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत, पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह अनेकजण शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात दाखल झाले होते.  तसेच निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी महापौर हा शिवसेनेचाच असेल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारीत शिवसेनेला वरचढ होऊ देण्याची संधीच मिळू दिली नाही. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही चौथी निवडणूक होती. २००३ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ३५ पेक्षा जास्त जागा जिंकून प्रथम महापौरपद मिळविण्याचा बहुमान शिवसेनेला मिळाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला हे यश कायम राखता आले नाही. २००८ मध्ये १६ तर २०१३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला ११ जागांवर समाधान मिळाले होते. यावेळी स्बळाचा नारा देवून निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला २०१८च्या निवडणुकीत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना व लोकसंग्राम पक्षांनी एकमेकांना पाठिंबा देवून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तसेच शिवसेनेने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस, अपक्ष विद्यमान नगरसेवकांनाही पक्षात प्रवेश देवून ऐनवेळी उमेदवारी दिली होती. मात्र त्याचा पक्षाला काहीच उपयोग झालेला नाही. या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या जागावरून शहरात त्यांना किती समर्थन आहे, हे स्पष्ट झालेले आहे. दरम्यान महापालिकेसोबत शिवसेना विधानसभा, लोकसभेची निवडणूकही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांना अजून किती तयारी करावी लागेल हे स्पष्ट होते आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक