लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथे ३१ पारायण महोत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ठीकठिकाणी शोभा यात्रेचे फुलांच्या वर्षावाने फटाक्यांच्या आतिषबाजी करुन भाविकांनी स्वागत केले.शोभयात्रेची सुरुवात श्रीकृष्ण प्रणामी मंदिरा पासून श्री ५ महामंगल पुरी धामचे गादीपती आचार्य सूर्यनारायण दास महाराज यांच्या हस्ते महाआरती करून सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेसाठी लाकडी सिंहासन सजविण्यात आले होते. त्यात प्रणामी धर्माचा मुळ ग्रंथ तारतम सागर ग्रंथ ठेवून त्यावर चांदीचे राधाकृष्णाचे मुकुट व बनसरी ठेवण्यात आले होते. सर्व भाविकांनी व सुहासिनीनी आरती पूजन केले. श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात सुरू असलेल्या ३१ पारायण महोत्सवा निमित्ताने भव्य शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गांनी काढण्यात आली. या शोभयात्रेत श्री ५ महामंगलपुरी धाम सुरतचे गादीपती आचार्य श्री श्री १०८ सूर्यनारायण दास महाराज, निजानन्द आश्रम शेरपूर धाम उ.प्र.चे गादीपती संत श्री श्री १०८ स्वामी सिंधू सागर महाराज, श्रीकृष्ण प्रणामी मंदिर शक्ती नगर दिल्लीचे गादीपती श्री श्री १०८ परीन सखी महाराज, प्राणनाथ धाम डाकोर गुजरातचे गादीपती युवासंत श्री श्री १०८ सुमित कृष्ण ठाकुर महाराज, तपोभूमी धामचे संथापक अध्यक्ष संत मुरलीदास महाराज, पुजारी संत श्रीपाल महाराज, प्राणनाथ ज्ञान केंद्र मुंबई येथील रचिता सखी प्रणामी पुजारी जगदीश कासार, सोनगीरचे सरपंच धंनजय कासार या महोत्सवाचे मुख्य यजमान मन्नालाल कासार, उदय कासार, सोनगीर महाविद्यालयाचे चेअरमन अमृतराव कासार, राजनाथ कासार, भानुदास कासार, मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल कासार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबट, उदय कासार, शामकांत कासार, सुरेश कासार, शाम कासार, गोविंद कासार, सुरेश गोयल आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी बाईजुराज महिला मंडळचे शोभा कासार, रुपाली कासार, भाग्यश्री कासार, शशिकला तांबट, शशी कासार, कीर्ती कासार, बबिता कासार, संजय कासार, प्रशांत कासार ,आदी परिश्रम घेत आहे.
सोनगीरला पारायण महोत्सवानिमित्त शोभायात्रा़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 9:54 PM