लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : धुळे रस्त्यावर दोंडाईचा जवळील हॉटेल प्रशांतनजिक कारला अचानक शनिवारी दुपारी आग लागली़ या घटनेत कार संपूर्ण जळून खाक झाली़ सुदेवाने या दुर्घटनेत जीवितहानि झालेली नाही़ शॉकसर्किटने कारला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक सुका पाटिल व त्यांची पत्नी इंदुबाई पाटील हे शिंदखेड़ा तालुक्यातील धमाणे येथे नातेवाइकांकडे लग्नाला गेले होते. (एमएच १८ व्ही ४९९) या क्रमांकाच्या कारने धमाणे येथून लग्न आटोपून दोंडाईचा - धुळे रस्त्याने चिमठाणे येथे ते जात होते़ दोंडाईचानजिक ३ किमी इतक्या अंतरावर असलेल्या हॉटेल प्रशांतनजिक कारला अचानक शॉकसर्किट झाल्याने कारला आग लागली़ आग लागल्याचे लक्षात येताच पाटील दाम्पत्याने तात्काळ कार थांबवून ते बाहेर पडले़ यावेळी कार संपूर्ण जळाली़ या दुर्घटनेत पाटील दाम्पत्यास काहीही दुखापत झाली नाही़ दोनही सुरक्षित आहेत. कारला लागलेली आग पाण्याने विझविण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़
शॉकसर्किटने आग कार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 6:12 PM
चिमठाणेनजिक घटना : जीवितहानी टळली
ठळक मुद्देदोंडाईचाजवळील घटनाशॉकसर्किटने कारला आगसुदेवाने जीवितहानी टळली