आॅनलाइन लोकमतशिंदखेडा (जि.धुळे)- येथील बसस्थानक समोर असलेल्या सांवत फोटो फ्रेमिग व गीफ्ट शॉप ला मध्यरात्री आग लागली. या आगीत सुमारे दोन लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे.बसस्थानकासमोर सावंत फोटो फ्रेमिंग व गीफ्ट शॉपचे दुकान आहे. या दुकानातून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास धुर येत असल्याचे लक्षात येताच जवळच्या दुकानाचे मालकांनी एकमेकांना बोलवुन प्रथम शिंदखेडा पोलिस स्टेशनला संपर्क साधला. त्यानंतर नगरपंचायतची अग्निशमन गाडीला पाचारण केले. दुकान बंद असल्याने ते उघडण्यास थोडा उशीर झाला. उघडल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक झाले होते.दुकानात लहान साईज दहा बाय दहा ते मोठ्या तीस ते पन्नास साईजच्या फोटो फ्रेम तयार होत्या.फ्रेमसाठी लागणारा प्लायवुड, काच, लाकडी फ्रेम, फोटो पोस्टर, व्हिडीओ व फोटो कॅमेरा यांसह लग्नसराई सुरू मोठ्या प्रमाणावर गीफ्ट आणलेल्या होत्या. या सर्व वस्तू जळुन खाक झाल्या आहेत. साधारणपणे सुमारे दोन लाखांचा व दुकानातील सर्व माल जळाला आहे.घटनास्थळी जवळचे दुकान मालक, मित्र मंडळ, पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशामक दलाच्या कर्मचारी तात्काळ मदतीसाठी धावून आले.हे दुकान शिंदखेडा येथील मनोहर पंढरीनाथ सावंत यांचे आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला सकाळी उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.