निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर मंडळात अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते दुपारी ११ वाजेपर्यंत सुरू असतात. परंतु नऊ वाजेपासून ११ पर्यंत प्रचंड गर्दी असते. याचे दुष्परिणाम काही काळात पिंपळनेर शहरासह व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानांची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात याव्यात. म्हणजे गर्दी न करता लोक आपले वस्तू खरेदी करू शकतील. आणि पुढील होणारे संक्रमण कमी होण्यास मदत होईल.
निवेदन देतेवेळी पिंपळनेर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन कोतकर, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष जगदीश धामणे, मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण देसले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र महाराज दहिवेलकर, मंडळ कार्यालय प्रमुख योगेश कोठावदे, पिंपळनेर शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र कोठावदे, व्यापारी प्रतिनिधी प्रमोद बच्छाव हे उपस्थित होते.