धुळे : धुळे मनपा निवडणुकीच्या ७४ जागांसाठी ३५५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान घेण्यात येत आहे़ सकाळी साडेसात वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व पथकानी प्रत्यक्ष केंद्रांची पाहणी केली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी पाच टक्के मतदान झाले होते.
शहराचे विस्तारीकरण झाल्यामुळे यंदा मतदानासाठी ४६९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडु नये, म्हणुन २ हजार २५० कर्मचाºयांना नियुक्त करण्यात आले असुन सकाळी पहिल्या टप्प्यात होणाºया मतदानासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसुन आला़ देवपूर येथील राजीव गांधी विद्यालयातील मतदार केंद्रावर पोलीस निरीक्षक सतीष गारोेडे यांच्या पथकांने पाहणी केली होती़ शेवटच्या दिवशी देखील केद्राबाहेर चिट्या वाटप-मनपा कर्मचाºयांना मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठया पोहोचविण्याची जबाबदारी सोपविली होती़ मात्र बहुतांश नागरिकांना मतदार चिठ्ठया पोहोचल्या नसल्याने मतदार केद्राबाहेर चिट्या देण्यात येत आहेत.
धुळ्यामध्ये सरासरी झालेली मतदानाची टक्केवारी...
प्रभाग १,२,६- अप्राप्तप्रभाग ३,४,५- ५.८१%प्रभाग ७,१५,१६- ५.००%प्रभाग ८,९,१०,११- ५.८४%प्रभाग १४,१७,१८- ४.७४%प्रभाग १२, १३,१९- ७.५२%
तर अहमदनगरमध्येही मतदारांनी अल्प प्रतिसाद दाखविला असून मतदान केंद्रावर तीन-चार मतदारच दिसत आहेत. सकाळी साडेनऊ पर्यंत 9 ते 10 टक्के मतदान झाले आहे.