शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शिंदखेडा तालुक्यात कोटय़वधीचा फटका

By admin | Published: September 20, 2015 12:58 AM

हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान : 3 विहिरी खचल्या, दलवाडेत पाच लाखांचे संसारोपयोगी साहित्य वाहिले

धुळे : दोन महिन्यांच्या दडीनंतर बरसलेल्या पावसाने शिंदखेडा तालुक्यात हाहाकार माजविला. हजारो हेक्टरवरील उभी पिके जमीनदोस्त झाल्याने नुकसानीचा आकडा कोटीवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शिंदखेडा मंडळात ढगफुटीमुळे दलवाडेच्या आदिवासी वस्तीतील घरामध्ये पाणी शिरल्याने दीडशे कुटुंबांना फटका बसला. त्यांचे घरांमधील सुमारे 5 लाखांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याचा तर तीन शेतक:यांच्या विहिरी खचल्याने 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तापी काठावरील सोनेवाडी, नेवाडे व वरसूस परिसरात मोठय़ा प्रमाणावर शेतांमध्ये पाणी शिरल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन-अडीच हजार हेक्टर क्षेत्रात ही स्थिती उदभवली आहे. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील सर्जेराव अभिमन पाटील, शांताराम पाटील यांच्या विहिरी खचल्या आहेत.

घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 300 वर घरांची पडझड झाली आहे. त्यात सर्वाधिक पडझड शिंदखेडा तालुक्यात झाली आहे. तसेच धुळे तालुक्यात दोन तर साक्री तालुक्यात दोन अशी एकूण चार जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीमुळे शिंदखेडा तालुक्यात 12 गावांमध्ये एक हजार 60 हेक्टर आर क्षेत्रातील शेती बाधित झाली असून शिरपूर तालुक्यातील तीन गावांमध्ये 60 हेक्टर आर क्षेत्राला फटका बसला आहे.एकूण 1 हजार 120 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पदाधिका:यांकडून धीर

शिंदखेडा तालुक्यात झालेल्या नुकसानाची पं.स. सभापती डॉ.दीपक बोरसे, उपसभापती भटू देसले, गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांनी पाहणी केली. पुराचे पाणी घरांमध्ये शिरलेल्या दलवाडे येथील वस्तीला भेट देऊन रहिवाशांना धीर दिला. धुळे तालुक्यातील नेर, साक्री तालुक्यातही घरांची पडझड झाली आहे. पंचनाम्यांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.