शिरपूर : येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित येथील इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड डेव्हल्पमेंट परिसंस्थेत इंस्टिट्यूटस्तरीय अविष्कार २०१९ पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत आय.एम.आर.डी. येथील एकूण ११ गटांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पोस्टर प्रेझेंटेशन व रिसर्च मॉडेलव्दारे सादरीकरण केले. त्यात ई-कॉमर्स, इ-बिझनेस, आय.सी.टी.इन एज्युकेशन, स्मार्ट कॉस्टलाईन सिक्युरिटी, अॅसिड अटॅक, ग्रिन मॅनेजमेंट प्लास्टीक पोल्युशन, ई-व्हेयीकल, वुमन हेल्थ इश्यु या विषयांवर पोस्टर व मॉडेल सादर करण्यात आले. अविष्कारचे उद्घाटन प्राचार्या डॉ.वैशाली पाटील यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण डॉ.मनोज पटेल व प्रा.अमुल तांबोळी यांनी परिक्षण केले. पदवी विभागातून श्रध्दा रविंद्र वैद्य व रश्मी प्रदिप जेठालिया यांच्या गटाला प्रथम जाहिर करण्यात आले़ द्वितीय क्रमांक येगेश गुलाब वाघ व हरिष गोकुळ पाटील तर उच्च पदवी विभागातून रेखा खंगाराम पटेल व मयुरी सुधाकर बोरसे यांच्या गटाला प्रथम, रिसर्च मॉडेलमधुन मुस्कान मनसुखानी यांना निवडण्यात आले.
पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत श्रद्धा व रश्मी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:43 PM