शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अष्टान्हिक पर्वानिमित्त श्री सिद्धचक्र विधान कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:26 PM

सोनगीर येथे आयोजन : दोन आठवड्यांपासून विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात, मिरवणुकीने सांगता  

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर  :   येथील  दिगंबर जैन समाजातर्फे श्री १००८ पुष्पदन्त जैन मंदिरात सकल जैन समाजाकडून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अष्टान्हिक महापर्वानिमित्त नुकताच आयोजित श्री सिद्धचक्र मंडल विधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने गेल्या दोन आठवड्यांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विधान भव्य मिरवणुकीने सुरूवात करून मंदिरात ध्वजरोहण व कलश स्थापना करून सिद्धचक्र मंडल विधानाला सुरवात करण्यात आली होती. दरम्यान  पूजेसाठी इंद्र-इंद्राणी म्हणून भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावर्षी विधानात तीस वर्षानंतर सुमारे २३००  नारळाचा भरणा करण्यात आला होता. या काळात पूजन, जप, महाआरती अशा विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. हे विधान मंदिरात आठ दिवसांपासून सुरू होते.  दरम्यानच्या काळात विधान पूजन, जप करण्यात आले. यावेळी विधीचे वाचन पुजारी विरेंद्र जैन यांनी केले. याप्रसंगी सोनगीर व परिसरातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी विधान विसर्जनानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी महिला, पुरुष जैन समाजबांधव उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  पालखी मंदिरात स्वस्थानी पोहचल्यानंतर महाआरती करुन विधानाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन समाज बांधव, मंदिर विश्वस्त मंडळ, महिला मंडळ, जैन युवा मंडळ सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या कालावधीत गावात सर्वत्र चैतन्य व उत्साहाचे वातावरण होते. 

टॅग्स :Dhuleधुळे