लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील सर्वच मंदिरांमध्ये प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा रविवारी दुपारी भाविकांच्या अपूर्व उत्साहात साजरा झाला. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.शहरात शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले तीन श्रीराम मंदिर आहेत. त्यात जुना आग्रारोड, खोलगल्ली (गल्ली नं.२) व जुन्या धुळ्यातील सुभाषनगरातील मदिंराचा समावेश आहे.्नरामनवमीनिमित्त सर्वच मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सकाळी ११ वाजेपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी होवू लागली होती. दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.आग्रारोडवरील राममंदिर जुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदीर संस्थानास सुमारे अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे गुढीपाडवा ते राम नवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येत आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजेपासून श्रीराम जन्मापर्यंत संजय कुळकर्णी यांचे कीर्तन झाले. दुपारी ठीक १२ वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन म्हणण्यात येत जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भाविकांनी श्रीरामाचा एकच जयघोष केला.सुभाषनगरातील राममंदिरजुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा साजरा अपुर्व उत्साहात साजरा झाला. स्थानिक भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणीही भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.बाईक रॅलीरामनवमीनिमित्त शहरातील विविध भागातून बाईक रॅली काढण्यात आली. चारचाकीवर श्रीरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ दुचाकीस्वार होते. श्रीरामाचा जयघोष करीत ही रॅली शहरातील विविध मार्गावरून मार्गस्थ होत होती.