आॅनलाइन लोकमतधुळे : बलिप्रतिपदेनिमित्त गवळी समाजातर्फे यावर्षीही रेड्यांची झुंजीचा (सगर) कार्यक्रम मोगलाई गवळीवाडा येथे सोमवारी दुपारी झाला. ही झुंज लक्षवेधक ठरली होती.बलिप्रतिपदादिनानिमित्त गवळी समाज आपल्या गायी, म्हशी,रेडा, वासरू यांची विधीवत पूजा करून, दिवाळी साजरी करीत असतात. याचाच एक भाग म्हणून बलिप्रतिपदेला रेड्याची झुंज व मरिमातेच्या मंदिरात दर्शनाचा कार्यक्रम होत असतो. मोगलाई भागात गवळी समाज बांधवांनी गायी, म्हशी, रेडा, वासरू यांची पूजा करून मरीमाता मंदिरापर्यंत मिरवणूक काढली. पांझरा नदीच्या पात्रातील बंधाऱ्याजवळ रेड्यांच्या झुंजीचा कार्यक्रम झाला. यावेळी रेड्यांना रंगीबेरंगी रंगानी सजविण्यात आले होते.झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यशस्वीतेसाठी गवळी पंच विजय व्यायामशाळेचे अध्यक्ष भगवान घुगरे, संभाजी लंगोटे, पांडुरंग उदीकर, उमाजी हुच्चे, भिमराज घुगरे, नागोजी नागापुरे, विठोबा पीरनाईक, दत्तू बिडकर, बंटी घुगरे, भागवत घुगरे, शिवाजी लंगोटे, राजू घुगरे आदींनी परिश्रम घेतले.
धुळ्यात रेड्यांची झुंज ठरली लक्षवेधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:59 AM