धुळे : राज्यभर सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात एकसारखेपणा आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सुधारित नमुन्याचा वापर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.सुधारित नमुन्यास मान्यताशाळा सोडल्याचा दाखला व जनरल रजिस्टरच्या सुधारित नमुन्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात व जनरल रजिस्टरमध्ये बदल करावा लागणार आहे. हा शासन निर्णय सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांना हा निर्णय लागू राहणार आहे. नवीन नमुन्यात छपाईचे आदेशसर्व शाळा प्रमुखांना जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांची शासनाने दिलेल्या नमुन्यात छपाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एकवाक्यता नसल्याने संभ्रमसध्या शाळा-शाळांमधून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एकवाक्यता नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जनरल रजिस्टरमधील नोंदीत राज्यभर एकवाक्यता असणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती.सरल प्रणालीसाठीही बदल तसेच सरल प्रणालीमार्फत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी काही बदल करणे आवश्यक होते. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणकोणत्या नोंदणी आवश्यक आहेत, याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाºया शाळांसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जनरल रजिस्टरमध्ये राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. तसेच याची अंमलबजावणी यावर्षीपासूनच होणार आहे.यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ७ मार्च रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.जनरल रजिस्टरमध्येही राहणार बदलजनरल रजिस्टरमध्ये दाखल्यातील सर्व नोंदी, दाखला मिळाल्याचा दिनांक व पालक स्वाक्षरी, नोंदी अचूक असल्याची पालकाची स्वाक्षरी आदी बाबींचा समावेश असणार आहे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्त्वाचा दस्तावेज असतो. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसºया शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण ओळखच असते. यामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी राज्यस्तरावरून बºयाच दिवसापासून प्रयत्न सुरू होते.
शाळा दाखल्यांमध्ये येणार सारखेपणा!
By admin | Published: March 09, 2017 11:29 PM