लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील गावाच्या उत्तर दिशेला एकांतात असलेल्या तीन धार्मिक स्थळांवर गुरूवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यात हजारो रुपये किंमतीच्या मुद्देमालासह रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले. या मुळे भीतीचे वातावरण आहे. येथील तपोभूमी धाम प्रणामी मंदिरातील चांदीचे देव (मुकुट) तसेच मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीतील कपाट फोडून ताट, तांब्या, आरत्या, नाणे चोरी केले व खोलीतील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त केला. मंदिरातील दान पेटी मागच्या बाजूला मिळून आली. पेटी फोडून त्यातील काही रोख रक्कम असा हजारोंचा ऐवज चोरट्यांनी एकट्या तपोभूमी धाम मंदिरातून चोरून नेला. दरम्यान तपोभूमी धाममध्ये चोरी झाल्याची दोन वर्षातील ही चौथी घटना आहे. याठिकाणी या अगोदर देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या बाजुलाच असलेल्या ठाकुरसिंह बाबा यांच्या मानव रुहानी केंद्राचा मुख्य दरवाजा तोडून या ठिकाणची दानपेटीही चोरट्यांनी फोडली व काही रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान याच भागात असलेल्या आनंदवन संस्थांनच्या गुरूगोविंद मंदिराचा मुख्य लोखंडी दरवाजा तोडून मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी जवळच असलेल्या गोडविहिरीच्या मागील बाजूस काटेरी झुडपात नेऊन फोडल्या व त्यातील रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची केबल तोडून ते निकामी केल्याचे आढळून आले. तसेच जवळच असलेल्या मधूसुधन महाराज मंदिरात दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी ते अयशस्वी झाले. दरम्यान सकाळी चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटना स्थळाची पाहणी केली. सुरुवातीला गुरूगोविंद महाराज मंदिरात चोरी करून नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तपोभूमी धामकडे वळवला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. तपोभूमी धाम प्रणामी मंदिरात दोन वर्षात ही चौथ्यांदा तर दोन महिन्यात दुसºयांदा़ गेल्या एप्रिल महिन्यात याच प्रणामी मंदिरात व महामार्गालगत असलेल्या गॅस एजन्सीमध्ये चोरीची घटना घडली होती़ या परिसरातील मंदिरामध्ये तसेच कासार गल्लीतील श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात देखील तीन वेळा चोरी झाली आहे़ पेडकाई देवी मंदिरातही चोरट्यांची हातसफाईशिंदखेडा : तालुक्यातील साळवे गाव शिवारात असलेल्या पेडकाई देवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांने चोरुन नेल्याची घटना बुधवारी पहाटे १ ते सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली़ पेडकाई देवी मंदिरातील दानपेटी सळई अथवा कोणत्यातरी हत्याराने तोडून त्यातील रक्कम चोरुन नेण्यात आली आहे़ यात अंदाजे १ हजार ५०० रुपये असावेत असा अंदाज आहे़ याप्रकरणी मंदिराचे ट्रस्टी डाकोरसिंग चंद्रसिंग गिरासे (४१) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली़ त्यानुसार, बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ शिंदखेडा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़
सोनगिरात तीन मंदिरांमध्ये चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:43 PM