साक्रीनजिक ट्रॉला-पिकअपच्या धडकेत एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:13 PM
युवक पिंपळनेरचा : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना, वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : भरधाव वेगाने येणाºया ट्राला आणि पिकअप वाहन यांच्यात झालेल्या अपघातात पिकअप चालक युवकाचा जागीच मृत्यू झाला़ अपघाताची ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील साक्रीनजिक घडली़ या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ ट्रालाचालक अपघातानंतर फरार झाला़ पिंपळनेर येथील यशोदा नगरात राहणारा सुनील मुसळे याचा किराणा व्यवसाय आहे़ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एमएच ४७ ई ०९०१ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाने नागली घेऊन जात असताना नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील साक्रीनजिक एका हॉस्पिटलजवळ धुळ्याहून गुजरातकडे जीजे ०५ एयु ७०६७ क्रमांकाच्या ट्रालाने जोरदार धडक दिली़ समोरुन बसलेल्या या धडकेत गाडीच्या स्टेअरिंग आणि बॅकसिट यात दाबला गेला़ पिकअप वाहनाचे स्टेअरिंग सुनील याच्या पोटात घुसल्याने तो जबर जखमी झाला़ परिणामी त्याचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघात इतका जोरदार झाला की पिकअप वाहनातील धान्य रस्त्यावर फेकले गेले़ या अपघातानंतर ट्रॉलाचालक ट्रॉला सोडून पळून गेला़ अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरीक घटनास्थळी धावत आले़ त्यांनी पिकअप वाहनात अडकलेला चालक सुनील याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तो दाबला गेल्याने वाहनाचे दारही उघडत नसल्याने सुनीलचा मृतदेह काढणे उपस्थितांना अवघड झाले होते़ परंतु अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह काढण्यात नागरीकांना यश आले़ त्याचा मृतदेह साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला़ यावेळेस मात्र महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले़ नागरीकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली़ अपघात झाल्याची माहिती पिंपळनेर गावात धडकताच शोककळा पसरली़ सुनील हा सर्वांशी मिळून-मिसळून वागत असल्याने त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली़ अपघाताची माहिती मिळताच सुनीलचे नातलग, त्याचा मित्र परिवार साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले़ पंचनाम्याचा सोपस्कार पार पडल्यानंतर सुनीलचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला़ सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे़ महामार्ग ठरला मृत्यूचा सापळानागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग आणि साक्रीनजिकचा परिसर हा घडणाºया घटनांवरुन मृत्यूचा सापळा होत असल्याची प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरीकांकडून व्यक्त होऊ लागली आहे़ महामार्ग गावातून जात असल्याने बहुधा अपघाताची मालिका होत असल्याने ही बाब प्रशासकीय पातळीवर गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़ अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी देखील आपले वाहन सांभाळून चालवायला हवे़ मंगळवारच्या अपघातात नेमका दोष कोणाचा? यावर चर्चा होत आहे़