- सुनील साळुंखे
इम्पेरिअल सोसायटी आॅफ इनोवेटिव्ह इंजिनिअर्स (आय.एस.आय.इ.) द्वारा नुकत्याच आयोजित आशिया खंडातील सर्वात मोठी सौर ऊर्जा चलित वाहनांच्या स्पर्धेत श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित सावळदे येथील एन.एम.आय.एम.एस. मुकेश पटेल स्कूल आॅफ टेकनॉलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनिअरिंग कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना (स्पेक्टर संघ) हिरो इलेक्ट्रिक स्पिरिट अवॉर्ड हे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले़इम्पेरिअल सोसायटी आॅफ इनोवेटिव्ह इंजिनिर्स हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आवडते ई-मोबिलिटी मोटर्स स्पोर्ट्स, शिक्षण आणि संशोधन प्रकाशन संस्था असून ही भारतातील पहिली संस्था आहे जे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना व्यावसायिक हिरव्या गतिशीलतेवर चालना देण्यास प्रेरित करते़ आयएसआयई-ईएसव्हीसी केवळ मोटरस्पोर्ट नाही. ई-मोबिलिटी आणि सौर उर्जेबद्दल जागरूकता आणि कौशल्याचा प्रसार युवा वर्गात केला जातो.विद्यार्थ्यांनी डिझाइनिंग, सामग्रीची खरेदी आणि यांत्रिक कार्यशाळेत सौर ऊर्जा चालीत वाहन तयार करण्यापासून सर्वसाधारण सहा महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यांना त्यांच्या स्वत:च्या प्रयत्नांसह कार्यशाळा प्रयोगशाळा प्रशिक्षकांनी मदत केली. शेवटचा परिणाम म्हणजे २ किलो वॅट मोटरने चालविलेले एक अतिशय चांगले डिझाइन केलेले सौर वाहन ज्याचे एकूण ४०० वॅट रेटिंगचे चार सौर पॅनेल आहे. बॅटरी रेटिंग ७८ अॅम्पिअर-तास आणि ४८ व्होल्टेस आहे. एकूण आकार गाडी १०० इंच बाय ६० इंच बाय ६० इंच इतकीच मर्यादित होती. सुमारे १८ संघांनी प्रारंभिक फेरी पूर्ण केली आणि अॅन्डुरन्स रेसचा भाग बनण्याची संधी मिळविली. स्पेक्टर संघाने विशेष मेहनत घेऊन आपल्या पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. त्यात अमित मिश्रा (विद्यार्थी बी.टेक.मेकॅनिकल अभियांत्रिकी तिसरे वर्ष) याने या विजयी संघाचे नेतृत्व केले. एन.एम.आय.एम.एस. शिरपूर कॅम्पसचे डॉ.आर.एस.गौड, मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे, डॉ.निखलेशकुमार शर्मा, डॉ.के.के. गुप्ता, प्रा़प्रवीणकुमार लोहारकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एस.व्ही.के.एम. च्या एन.एम.आय.एम.एस.चे कुलपती अमरिशभाई पटेल, एस.व्ही.के.एम. संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, एमपीटीपी कॅम्पसचे सल्लागार राजगोपाल भंडारी, ट्रस्टी तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल न एसव्हीकेएमचे विश्वस्तांनी कौतुक केले.आय.एस.आय.इ. इंडिया हे संघटन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक हिरव्या गतिशिलतेला चालना देण्यास प्रेरीत करते. कौशल्य, नवकल्पना व संशोधनास संधीसाठी अशी प्रदर्शने घेते.