लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : सोनगीर - दोंडाईचा राज्य महामार्गावर गुजरात राज्यातील एका व्यापाराचा खून झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उजेडात आली़ सोनगीर-दोंडाईचा राज्य मार्गावर व्यापारी हा त्याच्या ताब्यातील जीजे १ केई ६०९५ या क्रमांकाच्या कारने प्रवास करीत होता़ हॉटेल धनश्रीच्या पुढे काही अंतरावर ताब्यातील गाडी जवळ मयत मृत अवस्थेत आढळून आला़ माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले़ मयताच्या डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले़ यामुळे खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ प्राथमिक माहितीनुसार व्यापारी हा गुजरात राज्यातील अहमदाबाद मधील असल्याची माहिती समोर येत आहे़ मयत हा कारजवळ एकटा आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे़ मयताच्या सोबत आणखी कोणी होते का? याचा शोध घेतला जात आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़ ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वान पथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग दाखविला आहे़ खून करुन व्यापाºयाकडील रोख रक्कम व ऐवज लुटून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ सोनगीर पोलीस तपास करीत आहेत़
गुजरातच्या व्यापाºयाचा सोनगीरनजिक खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:30 AM