धुळे : कोरोना पार्श्वभूमीच्या काळात नागरिकांना वेळेवर व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी महिन्याभरापासून मनपाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे़ काही भागात तांत्रिक अडचणीमुळे उशिरा पाणीपुरवठा होत आहे़ त्या भागातील प्रश्न सोडवून नियमित पाणीपुरवठा करावा अशा सुचना मनपा स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी दिल्यात़प्रभाग क्र. ६ मध्ये नियमित पाणी पुरवठा होत नाही़ त्यामुळे येथील नागरिकांना कोरोनाच्या काळात पाण्यासाठी भंटकंती करावी लागते़ प्रभाग सहामधील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी घेतली़ यावेळी प्रभाग क्र. सहाचे नगरसेवक किरण अहिरराव, रावसाहेब नांद्रे, दादाजी पाटील, राकेश कुलेवार, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसियर कमलेश सोनवणे आदी उपस्थित होते़यावेळी स्थायी समिती सुनील बैसाणे म्हणाले की,मनपाकडून दररोज प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यासंदर्भात माहिती देखील नागरिकांना देण्यात येत आहे़ मात्र काही भागात तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे़अशा भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवा़, येणाºया काळात अक्कलपाडा धरणाचे काम पूर्ण झाल्यास नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकले असेही सभापती बैसाणे यांनी सांगितले़
प्रभाग सहा मधील पाणीप्रश्न तातडीने सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:34 PM