लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरून सोनगीर येथील एका २८ वर्षीय तरूणाने तापीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली़ मयत हा शिरपूर टोल नाक्यावर कामाला होता़शनिवार १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सोनगीर येथील अधिकार राजेंद्र माळी याने सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरून उडी मारल्याची माहिती शिरपूर टोलनाक्यावर देण्यात आली़ तेथील कर्मचाºयांनी सोनगीर येथे त्याच्या नातेवाईकांना कळविल्यानंतर आप्तजणांनी सावळदे पुलावर धाव घेतली़ पट्टीचे पोहणारे श्रीराम कोळी, कैलास कोळी, उत्तम सोनवणे, भिम कोळी यांनी नदीच्या पात्रात मृतदेह शोधण्यास सुरूवात केली़ सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अधिकार माळी याचा मृतदेह शिंदखेडा तालुक्यातील दभाषी शिवारात मिळून आला़ यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न सोनगीर : येथील अधिकार राजेंंद्र माळी (२३) असे त्याचे नाव आहे. तो शिरपूर टोलप्लाझावर टोल वसुलीचे काम करीत होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मयत अधिकार माळी टोलप्लाझावर नियमितपणे व व्यवस्थित काम करीत होता. गेल्या तीन दिवसांपासून तो अस्वस्थ होता. म्हणून तीन दिवसांपुर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र टोलप्लाझावरील कर्मचाºयांनी त्याची समजूत घातली. आत्महत्येचे विचार असल्याचे तो बोलत होता असेही सहकारी कर्मचारीकडून ऐकायला मिळाले. दरम्यान आज दुपारी तो त्याची एमएच १८ बीजे ८३७३ या क्रमांकाच्या दुचाकीने तो शिरपूरकडे गेला. दीडच्या सुमारास त्याने तापी नदीत उडी घेतली तेव्हा दोन वाहनचालकांनी दोर फेकून त्याला वाचवायचा प्रयत्न केला पण त्याने दोर पकडला नाही असेही समजते. त्याच्या मोटारसायकलवरून त्याची ओळख पटून त्याचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस नाईक भीमराव बोरसे तपास करीत आहेत. त्याचे वडीलांचे छत्र यापुर्वीच हरवले आहे. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.
सोनगीरच्या तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:07 PM