शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:12 PM

छत्रपती गार्डनजवळील घटना : ६० हजाराचा ऐवज

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडून नेल्याची घटना शहरातील जुने जातपडताळणी कार्यालयाजवळ शनिवार २२ रोजी दुपारी घडली़ आझादनगर पोलिसात याप्रकरणी दोघांविरुध्द रात्री गुन्हा दाखल झाला. मार्केट यार्ड भागातील शिव कॉलनीत राहणारी कुंदा प्रदीप सोनवणे (५९) ही वृध्द महिला शहरातील जुने जातपडताळणी कार्यालय जवळील छत्रपती गार्डन जवळून जात असताना २५ ते २८ वयोगटातील दोन अनोळखी तरुण भरधाव वेगात दुचाकीने आले़ त्यांनी या महिलेच्या गळ्यातील ४ तोळे वजनाची व ६० हजार रुपये किंमतीची सोनपोत ओरबाडून घेत घटनास्थळावरुन धूम ठोकली.  ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ या महिलेने आरडाओरड केली़ परंतु दुपारची वेळ असल्याने या भागात कोणीही नव्हते़ परिसरात शोध घेतला असता दोघेही सापडले नाही़ त्यानंतर या महिलेने आझादनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना ‘आपबिती’ कथन केली़ शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्यानुसार अनोळखी दोघांविरुध्द भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे