शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

ई-सायकलद्वारे शक्य होणार पेरणी आणि फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 8:17 AM

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली जुन्या सायकलीपासून अ‍ॅग्रो ई-सायकल

अतुल जोशी धुळे : शेतकऱ्यांना शेतात नांगरटी, पेरणी, फवारणी यासारखी अनेक कष्टमय कामे करावी लागतात. मजूर न मिळाल्यास स्वत:च राबावे लागते. शेतक-यांचे हे कष्ट कमी व्हावेत आणि पेरणी, फवारणीचे काम सुलभ व्हावे, यासाठी धुळ्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अ‍ॅग्रो ई-सायकल तयार केलेली आहे. या सायकलीत असलेल्या सेन्सरमुळे पेरणी, फवारणीबरोबरच जमिनीतील आर्द्रता समजण्यास मदत होणार आहे. धुळ्याच्या एसएसव्हीपीएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकणा-या पीयूष नंदलाल जैन, जयेश राजेंद्र महाले, आनंद बापू गवळी व सुरभि मिलिंद गुळवे या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी हे नवे संशोधन केले आहे.जयेश महाले या विद्यार्थ्याकडे जुनी सायकल होती. त्या सायकलला ई- बाईक करण्याची संकल्पना त्याच्या मनता आली.. आणि हळू हळू त्यासाठी प्रयत्न सुरु केले.सायकलीच्या मागच्या बाजूने प्लॅस्टिकची बरणी लावण्यात आली. त्या बरणीत बियाणे टाकल्यास पेरणी होऊ शकेल. यासाठी टायमर लावलेला आहे. त्यामुळे ठराविक अंतरावरच बियाणे खाली पडेल अशी रचना केलेली आहे. तसेच फवारणीसाठीही पंप लावलेला आहे.या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास शेतक-याला मोठ्या क्षेत्रावर पेरणी करता येईल. बॅटरी संपल्यावर पायडल मारूनही सायकल चालविता येणार आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातूनही या सायकलच्या बॅट-या चार्ज करता येऊ शकतील. ही सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला. तसेच जवळपास २० ते २५ हजार रुपयांचा खर्च आला. हा खर्च विद्यार्थी व शिक्षकांनीच केला आहे. यासाठी या चारही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा.एस.एम. राजपूत, प्रा. संजीव जैन, हर्षल पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

सेन्सरच्या माध्यमातून समजेल जमिनीची उपयुक्तता४या सायकलला १२-१२ व्होल्टच्या दोन बॅटऱ्या लावून डीसी मोटार लावून ई-बाईक तयार केली. मात्र केवळ सायकल चालविणे हा विद्यार्थ्यांचा उद्देश नव्हता, तर त्या सायकलचा वापर शेतात पेरणी, फवारणीसाठी व्हावा असा होता. याशिवाय सायकलच्या समोरच्या बाजूस सेन्सर बसविण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेतकºयांना वातावरणातील आर्द्रता व जमीन पेरणीसाठी उपयुक्त आहे की नाही हे शेतक-यांना समजू शकेल, अशी रचना करण्यात आलेली आहे.

या ई-सायकलमुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणीसारखी कामे करता येतील. तसेच त्यांचे कष्ट कमी होऊन मजुरीवर होणारा खर्च कमी होण्यास मदत मिळेल. पीयूष जैन, संशोधक विद्यार्थीकृषीपूरक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी ही ई-सायकल तयार केलेली आहे. याचा शेतकºयांना निश्चित उपयोग होऊ शकेल.प्रा.संजीव जैन, मार्गदर्शक, इलेक्ट्रॉनिक्स विभाग 

टॅग्स :Farmerशेतकरी