धुळे : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सध्या वेग आला आहे. यासाठी २०१४ पर्यंतचे शिक्षण विभागाकडे ७१४ अर्ज प्रलंबित आहेत. तर सद्य:स्थितीत जिल्ह्यामध्ये २५० पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने भरण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन व राज्यस्तरावरून प्रक्रिया झाली तर शिक्षकांचे काम आणखी हलके होणार आहे. तसेच यामध्ये पारदर्शकता येण्यासही मदत होणार आहे.बिंदुनामावलीचे काम मार्गीआंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने नुकताच शिक्षकांच्या बिंदुनामावलीचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामध्ये पेसा (आदिवासी क्षेत्र) व नॉन पेसा (बिगर आदिवासी क्षेत्र) क्षेत्राची स्वतंत्र बिंदुनामावली जाहीर करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखलेपेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याने पेसा क्षेत्रातील शिक्षकांचे रहिवासी दाखले शिक्षण विभागाने मागविले आहेत. यासंदर्भात ४ आॅक्टोबर २०१६ रोजी पत्र पाठवून माहिती मागविण्यात आली आहे. परंतु ही माहितीच शिक्षकांकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.यादी आॅनलाइन जाहीरआंतरजिल्हा बदलीने धुळ्यात येण्यास इच्छुक असणाºया ज्या शिक्षकांनी पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत, त्यांची यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. तसेच ही यादी जिल्हा परिषदेमध्येही चिटकविण्यात आली आहे. ६३ जणांचेच प्रमाणपत्र सादरपेसा (आदिवासी क्षेत्र) क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या शिक्षकांच्याच नियुक्त्या यापुढे करण्यात येणार आहेत. पेसा क्षेत्रातील २६० शिक्षकांपैकी आतापर्यंत फक्त ६३ शिक्षकांनीच रहिवासी प्रमाणपत्र सादर केले आहेत. त्यापैकी ५६ शिक्षकांचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात आहेत, तर सात जणांचे विहित नमुन्यात नाहीत. या शिक्षकांना २४ मार्चपर्यंत पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.१९५० पासूनचा दाखलाअनुसूचित जमातीच्या आंतरजिल्हा बदलीने येणाºया प्राथमिक शिक्षकांचे अनुसूचित क्षेत्रातील २६ जानेवारी १९५० पासूनचे रहिवासी असल्याबाबतचे दाखले सादर करणे अनिवार्य आहे. या पत्रानुसार आतापर्यंत फक्त ५६ जणांनीच दाखले सादर केले आहेत. हे दाखले येत नाहीत तोपर्यंत आदिवासी क्षेत्रातील कोण? व बिगर आदिवासी क्षेत्रातील कर्मचारी कोण? हे निश्चित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविता येत नाही.नंदुरबारचे शिक्षक जास्तआंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांमध्ये सर्वात जास्त शिक्षक हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. एकूण ७१४ अर्जांपैकी ४५० अर्ज हे नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आल्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात येणाºया शिक्षकांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.२०१४ नंतरचा प्रश्न अनुत्तरित२०१४ पर्यंत आलेले अर्जच आतापर्यंत स्वीकारण्यात आले आहेत. २०१४ नंतर शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे २०१४ नंतरच्या शिक्षकांचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असल्याचे दिसून येत आहे.वर्षभरात एकही टप्पा झालेला नाहीगेल्या वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वेळा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये इतर जिल्ह्यातील २५० शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेण्यात आले. मात्र यावर्षी वर्षभरात आंतरजिल्हा बदलीसाठी एकदाही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असणाºया शिक्षकांची सध्या घुसमट सुरू असलेली दिसून येत आहे.४डिसेंबरच्या दरम्यान आंतरजिल्हा बदलीसाठी संपूर्ण प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाने केली होती; परंतु पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षकांची स्वतंत्र बिंदुनामावली (रोस्टर) करण्याच्या सूचना आल्यामुळे हे काम पुन्हा रखडले गेले. आता आदिवासी क्षेत्रात अनुसूचित जमातीच्याच शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला वेग
By admin | Published: March 24, 2017 12:12 AM