धुळे : मुंबई-आग्रा महामार्गाच्या दुरूस्तीला वेग दिला असून खड्डे बुजविल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे़पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते़ अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले होते़ धुळे शहरापासून आर्वी गावापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली होती़ त्यामुळे वाहनचालकांना समस्या निर्माण झाली होती़दरम्यान, पावसाने उसंत दिल्याने धुळे शहरापासून ते लळींग घाटापर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे़ रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तेवढा भाग खोदून त्याठिकाणी नव्याने खडीकरण आणि डांबरीकरण करुन रस्ता मजबूत केला जात आहे़मुंबई-आग्रा महामार्गावर टोल वसुल केला जातो़ त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी टोल वसुल करणाऱ्या कंपनीची असते़ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागाचे त्यावर नियंत्रण असते़मुंबई-आग्रा महामार्गाची दुरूस्ती झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे़ सदरचा महामार्ग खड्डेमुक्त केला जात आहे़
मुंबई-आग्रा महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 9:57 PM