शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
3
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
4
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
5
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
6
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
7
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
8
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
9
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
10
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
11
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
13
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
14
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
15
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
17
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
18
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
19
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
20
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...

 भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन ठार; दोंडाईचानजिक घटना

By देवेंद्र पाठक | Published: December 07, 2023 6:20 PM

भरधाव वेगाने येणारी कार दुचाकीवर जाऊन आदळली.

धुळे : भरधाव वेगाने येणारी कार दुचाकीवर जाऊन आदळली. त्यात दुचाकीवरील दोघेही तरुण गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ एक दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना दोंडाईचानजीक मंगळवारी दुपारी घडली. विजय सुदाम भील आणि सतिष प्रकाश धनगर असे मृत तरुणांची नावे आहेत. दोंडाईचा पोलिसात फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

एमएच ०५ बीएस ०६८१ क्रमांकाची कार शहादाकडून दोंडाईचाकडे भरधाव वेगाने येत होती. पीरवल्ली दर्गाजवळ कार येताच एमएच १८ बीवाय ६०६५ क्रमांकाच्या दुचाकीला कार जावून धडकली. अपघाताची ही घटना मंंगळवारी दुपारी ४ ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर तातडीने दोघाही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना एका पाठोपाठ एक याप्रमाणे दोघांचाी मृत्यू झाला. विजय सुदाम भील (वय ३३) आणि सतीश प्रकाश धनगर (वय ३१) (दोन्ही रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) अशी दोघा तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे चिमठाणे गावावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील दिलीप बाबुराव बागले (वय ५५) यांनी बुधवारी दुपारी २ वाजता दोडाईचा पाेलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ अ. २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचाा तपास सहायक पोलिस निरीक्षक ताटीकोंडीलवार करत आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघातDeathमृत्यू