शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

२ टँकरसह ७० लाखांचे स्पिरीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 9:50 PM

शिरपूर । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाची कारवाई, चार परप्रांतीय चालकांना अटक

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी गाव शिवारात स्पिरीटची हेराफेरी करीत असलेले २ टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने रंगेहात पकडल्याची घटना घडली़ या घटनेत २ मालवाहू गाडी, २ टँकरसह ७० लाखाचे मद्यार्क (स्पिरीट) जप्त करण्यात आले असून ४ परप्रांतीय संशयितांना अटक करण्यात आली आहे़२८ रोजी पहाटेच्या सुमारास नाशिक विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली़ महामार्गावरील सांगवी शिवारातील पार्कींग हायमास्ट स्ट्रीट लाईटखाली मद्यार्काची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, उपआयुक्त उषा वर्मा, अधिक्षक अर्जून ओहोळ यांना मिळाली होती़ नाशिक विभागीय भरारी पथकाने महामार्गावर सापळा रचून हेराफेरी करणाऱ्या वाहनांना पकडले़टँकर क्रमांक एच़आऱ६१-ए-९८८९ मध्ये २१ हजार लिटर अतिशुध्द मद्यार्क, टँकर क्रमांक एच़आऱ५५-एन-६९१ मध्ये २५ हजार लिटर अतीशुध्द मद्यार्क, आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम़एच़१८-एए-५०२ असे तिघे वाहनांना पकडण्यात आले़ त्यात २०० लिटर क्षमतेचे एकूण २२ प्लॅस्टीक बॅरेलमध्ये अंदाजे ४४०० लिटर अतिशुध्द मद्यार्क व १५ रिकामे प्लॅस्टीक बॅरल मद्यार्क वासाचे, पिकअप गाडी क्रमांक एम़एच़१८-एए-६६४२ हिच्यात २०० लिटर क्षमतेचे एकूण ८ प्लॅस्टीक बॅरलमध्ये १६०० लिटर अतीशुध्द मद्यार्क असा एकूण ७० लाख २ हजार ५०० रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या गुन्ह्यात २ टँकरसह २ मालवाहू असे ४ वाहने जप्त करण्यात आलीत़या गुन्ह्यात हेराफेरी करणारे चालक धर्मबीर जिलेसिंह रा़संबांधित जिलेसिंह उमेर्वास, भिवाना हरियाणा, मंजुनाथ रामअण्णा सीरंजी रा़रामअण्णा रोट्टीगवाड कोंकनकुरट्टी, कनार्टक, ओमप्रकाश रामफल जाट-दहिया रा़रामफल लाकरीया डिघल जि़झज्जर- हरियाना, परवीन धर्मवीर लसकरी रा़लकडीया ता़बेरी जि़झज्जर-हरियाणा असे चौघे परप्रांतीय चालकांना अटक करण्यात आली़ आहे. मात्र, आयशर व पिकअप या दोन्ही वाहनाचे चालक फरार झाले आहेत़ दरम्यान, विभागीय भरारी पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईमुळे राज्य उत्पादन विभागाच्या जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे