ाुसावळ : भुसावळ विभागातील भुसावळसह रावेर व बोदवड कृउबासाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल़े भुसावळसाठी 98़89 टक्के, रावेरला 97, तर बोदवडला 94 टक्के मतदान झाल़े सोमवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आह़े सर्वच उमेदवार व त्यांच्या पॅनलतर्फे विजयाचा दावा करण्यात आला़ 4भुसावळ : 99 टक्के मतदान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत 542 पैकी 536 मतदारांनी हक्क बजावला़ 98़89 टक्के मतदान झाल़े निवडणुकीत 37 उमेदवार रिंगणात आहेत़ शहरात तीनपूर्वीच शंभर टक्के मतदान शहरातील डी़एस़हायस्कूलमध्ये व्यापारी व हमाल-मापाडी मतदारसंघासाठी दोन स्वतंत्र केंद्र होत़े सकाळी मतदानाचा जोर काहीसा कमी असला तरी 11 वाजेनंतर विविध वाहनांद्वारे, तसेच दुचाकीद्वारे मतदारांची गर्दी दिसून आली़ दुपारी तीन वाजेपूर्वीच या केंद्रावर शंभर टक्के मतदान झाल़े व्यापारी मतदारसंघात सर्व 148 मतदारांनी हक्क बजावल्याने शंभर टक्के, तर हमाल-मापाडीसाठी 30 मतदारांनी हक्क बजावला़ 96़79 टक्के मतदान झाल़े त्यातील एक मतदार मयत असल्याचे सांगण्यात आल़े केंद्राध्यक्ष शिल्पा राजेपुराम व संगीता साळुंके होत्या़ निवडणूक अधिकारी अशोक बागल, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून शरद दराडे आहेत़ तालुक्यात केंद्र व मतदारसंघनिहाय झालेले मतदान असे- साकेगाव- सोसायटी 13 पैकी 13, ग्रामपंचायत 38 पैकी 37 साकरी- सोसायटी 38 पैकी 38, ग्रा़पं़ 37 पैकी 35 सुनसगाव- 26 पैकी 26, ग्रा़पं़ 32 पैकी 31 कु:हेपानाचे- सोसायटी 25 पैकी 25, ग्रा़पं़ 41 पैकी 41 किन्ही- सोसायटी 21 पैकी 21, ग्रा़पं़ 34 पैकी 34 मोंढाळे- सोसायटी 38 पैकी 38, ग्रा़पं़ 20 पैकी 19
कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ़उत्स्फूर्त मतदान
By admin | Published: September 21, 2015 12:15 AM