लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : भरधाव जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस टोल नाक्याजवळ रसायनाच्या टँकरवर आदळल्याची घटना सोमवारी घडली़ सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही़ दरम्यान, या प्रकरणाची नोंद मात्र पिंपळनेर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे़ नाशिकहून नंदुरबारच्या दिशेने जाणारी एमएच १४ बीटी १८०२ क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंपळनेर टोल नाक्याजवळ टीएन ८६ डी ११८८ क्रमांकाच्या टँकरवर आदळली़ टँकरमध्ये अॅसीड होते़ आंध्रप्रदेशातून हा टँकर गुजरात राज्यातील अंकलेश्वरकडे जात होता़ या अपघातात टँकरच्या मागच्या बाजुला असलेले दोन्ही टायर फुटले़ त्याचवेळेस बस या टँकरवर जावून आदळली़ या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसलीतरी याप्रकरणाची नोंद पिंपळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली़ बसचालक अशोक सिताराम चौधरी (३९, रा़ रनाळे ता़ नंदुरबार) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़
रसायनांच्या टँकरवर एसटी बस आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 6:16 PM