आॅनलाइन लोकमतवडजाई (जि.धुळे) : तालुक्यातील बाभुळवाडी गावात प्रवेश करण्यापुर्वी किंवा गावाबाहेर जाताना फरशी पुलावरिल पाण्यातुनच यावे लागते. या पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी पाण्यात उभे राहून आंदोलन केले.धुळे शहरापासुन अवध्या दहा ते बारा किलोमिटर अंतरावर बाभुळवाडी हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात प्रवेश करण्याआधी एक मोठा नाला आहे. त्या नाल्यावर २५ वर्षांपूर्वी फरशी पुल बाधण्यात आला होता, तो आता जीर्ण झाला आहे. पुलाच्या मध्य बागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या या नाल्याला भरपुर पाणी आले आहे. पुलावरून पाणी वाहत आहे. फरशीला पुलाला दोन्ही बाजुने कठडे नाहीत . पुलावरून जाताना तोल गेल्यास खाली पडण्याची भीती आहे. याच रस्त्यावरून शाळेची लहान मोठी मुले ये-जा करीत असतात. अनेकदा शासनस्तरावर निवेदन दिले आहेत पंचायत समितीच्या विकास आराखडयात पुलाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या नाल्यावरील पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी येथील पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब देसले, सरपंच किरण पवार, जे.के.वाघ, साहेबराव देवरे, अशोक पवार, राजेद्र पाटील, रघुनाथ पाटील, भगवान पाटील, धनराज पाटील, हरि पवारआदिनी पुलावरिल वाहत्या पाण्यात उभे राहुन आदोलन केले आहे.