लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुसरे उत्तर महाराष्टÑ विभागीय पक्षीमित्र संमेलनास साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे सुरुवात झाली आहे. दोन दिवसीय या संमेलनात नागरी आणि ग्रामीण भागातील पक्षी संवर्धन या विषयावर विचारमंथन होणार आहे. शनिवारी दुपारी पक्षी मित्र संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर कुºहाडे, स्वागत अध्यक्ष चैत्राम पवार, आमदार डी. एस. अहिरे, वनक्षेत्रपाल मीनाक्षी जोगदंडे, एस. के. शिसव, राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे, सरपंच अनिता पवार आदी उपस्थित होते. दोन दिवसीय संमेलनात ‘पक्षी संवर्धनापुढील आव्हाने’, ‘उत्तर महाराष्टÑातील धोकाग्रस्त पक्षी प्रजाती’, ‘उत्तर महाराष्टÑातील पक्षी वैभव’, ‘व्याघ्र संवर्धन आणि संचार मार्ग’, ‘वनहक्क कायदा अंमलबजावणी, परिणाम व आव्हाने’, जैव विविधता कायदा : जैव विविधता वारसा स्थळे, ‘वनसंवर्धनापुढील आव्हने’ या विषयांवर चर्चा होणार आहे.
जैव विविधतेचा प्रचारासाठी संमेलन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर कु-हाडे म्हणाले, की बारीपाडा येथे आज दुसरे पक्षीमित्र संमेलन होत आहे. या संमेलनासाठी उत्तर महाराष्टÑातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर येथील पक्षी मित्र आले आहेत. बारीपाडा भागात वेगवेगळ्या वनस्पती व पक्षांच्या जाती पाहण्यास मिळतात. ४७५ प्रजातीचे पक्षी आहेत. तसेच जैव विविधतेचा प्रचार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत करण्यासाठी हे संमेलन घेण्यामागचा उद्देश आहे. येथील परिसरात अनेक वृक्षांची लागवड आहे. याठिकाणी अनेक पक्षी येत असतात. तसेच नानाविध प्रकारच्या वनस्पती असल्याने पक्षी मित्र संमेलन येथे होत आहे.