जैताणे/निजामपूर,जि.धुळे, दि.21- गेल्यावर्षी साक्री तालुक्यातील खुडाणे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाजवळील घटबारी धरण फुटले होते. दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे अखेर येथील 350 ग्रामस्थ, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी लोकसहभागातून घटबारी धरण बांधण्याचा निश्चिय केला आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे.
3 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घटबारी धरण फुटले होते. या आपत्तीत खुडाणे व जैताणे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. खुडाणे गाव परिसरातील जलस्त्रोतांचे मुख्य स्त्रोत असणा:या रोहिणी नदीवर घटबारी मातीचे धरण आहे. धरण फुटल्यामुळे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात झालेला मुबलक पाऊस देखील नदीपात्रातून वाहून जात होता. यासाठी खुडाणे ग्रामपंचायत व तेथील ग्रामस्थांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला. जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन गेले. पंचनामे झाले.
धरण फुटल्यानंतर प्रशासनाची दिसून आलेली उदासिनता व निष्क्रियता याकडे लक्ष न देता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत धरण पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे. दरम्यान, हे काम जून महिन्याच्या अखेर्पयत पूर्ण होण्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले, खुडाणेच्या सरपंच कल्पना गवळे, भगवान जगदाळे, पराग माळी, डोमकाणी येथील मोहन ब्राrाणे, ग्रामसेवक मोहिते, डॉ. मितेश गवळे, निजामपूर पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे व पंचक्रोशीतील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणाच्या कामाला सुरुवात झाली.