लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास अक्कलपाडा पाणी योजना त्वरीत मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळयातील जाहीर प्रचारसभेत दिले होते़ त्यानुसार भाजपची सत्ता येताच अक्कलपाडा योजनेच्या हालचालींना सुरूवात झाली आहे़महापालिकेने यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून १४२ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता़ तत्पूर्वी मजीप्राच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धुळयातील जलस्त्रोतांची पाहणी देखील केली होती़ दरम्यान, १४२ कोटी रूपयांच्या या प्रस्तावात काही सुधारणा केल्या जाणार असून त्यानंतर अंतिम डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे़ या योजनेला लागलीच मंजूरी मिळू शकते़ या योजनेत अक्कलपाडा प्रकल्प ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ४० किमीची ९०० व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकली जाणार आहे़ त्याचबरोबरच ४५ एमएलडी क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प अक्कलपाडा प्रकल्पाजवळ उभारणे प्रस्तावित असून त्यासाठी मनपाला भूसंपादन करावे लागणार आहे़ त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांचीही दुरूस्ती या योजनेतून करवून घेतली जाणार आहे़ त्यामुळे योजनेचा अंतिम डीपीआर सुमारे १८० कोटींपर्यंत जाऊ शकतो़ अक्कलपाडा प्रकल्प ९० मीटर अर्थात ३०० फुट उंचीवर असून तेथेच पाणी शुध्द करून गुरूत्वाकर्षणाने धुळयात पोहचू शकते़ मनपाला पाणीपुरवठ्यावर कराव्या लागणाºया खर्चात मोठी बचत होणे अपेक्षित आहे़
अक्कलपाडा योजनेच्या हालचालींना सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 4:59 PM