यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सोडवून शेती बागयती झाली तर शेतकरी समृध्द होऊ शकतो, त्यामुळे धुळे तालुक्यात मी नेहमीच सिंचनाच्या कामांना प्राधान्य देऊन त्यासाठी निधी मंजूर करून आणतो. त्यासाठी अनेकवेळा सरकारशी भांडावेही लागते. मात्र शेतकर्यांच्या हितासाठी माझी नेहमीच संघर्षाची तयारी असते असेही ते म्हणाले.
यावेळी आमदारांसोबत वाडी शेवाडी प्रकल्प जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच लामकानी सरपंच धनराज पाटील, माजी पं. स. सदस्य परशुराम देवरे, रामी ज्येष्ठ नेते उपसरपंच दिलीप गिरासे, माजी सरपंच रोहिदास माळी, बुरझड माजी उपसरपंच एन. डी. पाटील, सरपंच मनीषा महाले, योगेश माळी, सरपंच संतोष पाटील, निंबा माळी, चंद्रकांत माळी, सुनंदा भिल आदी उपस्थित होते.
१८ कि. मी. पर्यंत पाणी-
रामी शिवारातील ९०० मीटरचे काम सुरू व्हावे म्हणून आ. कुणाल पाटील यांनी शेतकरी आणि जलसंपदा विभाग यांचा समन्वय साधून शेतकर्यांच्या प्रश्न सोडविल्यामुळे प्रलंबित कामाचा अडथळा दूर झाला. वाडी शेवाडी मुख्य उजवा कालव्याची एकूण लांबी १८ कि.मी. असून, या कालव्यावरील प्रलंबित ९०० मी.चे काम सुरू झाल्यामुळे धुळे तालुक्यातील लामकानी, रामी, बोरीस, वडणे, बुरझड आणि शिंदखेडा तालुक्यातील तामथरे, चिमठावळ, सवाई मुकटी आदी गावांतील शेतकर्यांच्या शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्यांनी आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे