आॅनलाइन लोकमतधुळे : महापालिका वृक्ष दत्तक योजनेची सुरूवात सिंधुरत्न शाळेपासून करण्यात आली आहे. सिंधुरत्नच्या विद्यार्थ्यांनी वृक्षवाढीचे व्रत घेतले आहे.वृक्ष लावण्यापेक्षा लावण्यात आलेली झाडे जगविणे व ते वाढविणे महत्वाचे असते ही गोष्ट लक्षात घेऊन ही संकल्पना आखली. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर सिंधुरत्न इंग्लिश स्कुलची निवड केली. या प्रकल्पास ‘सिंधुरत्न विद्यार्थी वृक्ष योजना’ असे नाव देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत शाळेत प्रत्येक पाच विद्यार्थ्यांच्याहस्ते एक वृक्ष लावण्यात आला. संबंधित विद्यार्थ्यावर त्या झाडाची निगा राखणे व संगोपनाची जबाबदारी आहे. त्या पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.या प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महाराष्टÑ राज्य सिंधी साहित्य अकादमी सदस्य सुरेश कुंदनाणी, नगरसेवक संजय जादव, हर्षकुमार रेलन, सुनील बैसाणे, बंसी जाधव, गुलशन उदासी, मंगला पाटील, राकेश कुलेवार, तनुकुमार दुसेजा, जेठानंद हासवाणी, जमनू लखवाणी, निनाद पाटील आदी उपस्थित होते.
धुळ्यात वृक्ष दत्तक योजनेची जल्लोषात सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:42 AM