धुळे : कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा कार्यानुभव शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे़ विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे शेतीविषयीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकºयांच्या दारापर्यंत पोहोचले असून शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील बांधावर मिळत आहे़फागणे ता़ धुळे येथे कृषी महाविद्यालय, दोंडाईचा येथील कृषीदुत ग्रामीण कृषी कायार्नुभव कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष कृतीतुन शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत.कृषी विद्यालयातील कृषीदुतांनी प्रत्यक्ष कृतीतुन शेतकºयांना तण व्यवस्थापण, फर्टीगेशन, किटकनाशकांचे मिश्रण कसे करावे, बीज प्रक्रिया व त्याचे फायदे, खतनिर्मिती प्रक्रिया, पिकांना खते देण्याच्या विविध पद्धती, पशु लसीकरण, बीज उगवण क्षमता चाचणी, फळबाग व विविध फळ झाडांचे कलम कसे करावे, पिक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजना यांबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवत आहेत.या उपक्रमात कृषीदूत जयंत प्रमोदकुमार अहिरराव व धनंजय देवरे यांनी शेतकºयांना माहिती दिली. कृषीदूतांना प्राचार्य डॉ. डी. आऱ पाटील, कृषी पर्यवेक्षक चौधरी, विषयतज्ञ प्रा. राहुल पाटील, वनस्पती शरीरशास्त्राचे प्रा. राजपुत प्रा.देशमुख (उद्यानविद्या), प्रा. आटोळे (मृदाविज्ञान), प्रा. वाघमोडे (पशुविज्ञान), प्रा. मराठे, प्रा. साळुंखे (किटकशास्त्र), प्रा. चव्हाण ( कृषी अर्थशास्त्र), प्रा. भगत ( कृषी विस्तार शिक्षण) यांनी प्रात्यक्षिकासाठी मदत व मार्गदर्शन केले. तसेच शिरीष पाटील, चौधरी यांनी सहकार्य केले.अपेक्षेप्रमाणे कपाशीची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे़ शेतकरी कुटूंबे शेतात राबताना दिसत आहेत़ याचा फायदा घेत विद्यार्थी बांधावर जावून शेतकºयांना मार्गदर्शन करीत असून शेतकºयांनाही माहिती मिळत आहे़
अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:21 PM