लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेतच माफी मागावी़ अन्यथा, राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला़ ‘अहिल्यादेवी होळकरांचे नाव सोलापूर विद्यापीठास दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल व विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा होईल’ असे विधान राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशा प्रकारचे विधान केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे़ थोर पुरुषांचा अशा प्रकारचा अवमान करणे हा प्रकार घृणास्पदच आहे़ तावडे यांनी विधानसभेत वक्तव्य केल्यामुळे त्यांनी विधानसभेतच माफी मागावी़ याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी आणि तशा आशयाचे निवेदन सादर करावे़ अन्यथा, राज्यव्यापी आंदोलन पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येईल़ राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निदर्शने केली जातील़ वेळ आल्यास मंत्री तावडे यांना जिल्हा बंदी देखील केली जाणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला़
राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत माफी मागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:27 PM
संजय सोनवणी : थोर पुरुषांचा अवमान प्रकरण
ठळक मुद्देमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत माफी मागावीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करावेवेळ आल्यास मंत्री तावडे यांना जिल्हा बंदी करण्यात येईल़