आॅनलाइन लोकमतधुळे : स्व.डॉ. सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब आॅफ धुळे विद्यानगरीतर्फे आयोजित ‘सूर्यकांत करंडक’ राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा १६ व १७ फेबु्रवारी रोजी हिरे भवन, जिल्हा न्यायालयाजवळ धुळे येथे होणार आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असल्याची माहिती रोटरी क्लबचे सेक्रेटरी प्रा. भूषण माळी यांनी दिली. पत्रकार भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेला स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरमन प्रा. शैलेश पाटील, कैलासपती चित्तम, रंगकर्मी संदीप पाचंगे उपस्थित होते.स्पर्धेसाठी राज्यातून १९ संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे. रंगमंचाला कै. शरद रामदास कबाडे रंगमंच असे नाव देण्यात आले आहे.स्पर्धेचे उदघाटन १६ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्याहस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी नऊ एकांकिका सादर होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी दिवसभरात १० एकांकिका सादर होणार आहेत. एकांकिका झाल्यानंतर रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यानंतर रात्री १० वाजता बक्षीस वितरण मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख (मुंबई) यांच्याहस्ते होणार आहे.स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या संघास अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व ११ हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय वैय्यक्तिक स्तरावर अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंगभूषा अशा विविध प्रकारात बक्षीस दिले जाणार आहे.
धुळे येथे उद्यापासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:12 AM
सूर्यकांता करंडक स्पर्धा : चौथे पर्व, १९ संघांना मिळाला प्रवेश, १७ रोजी होणार समारोप
ठळक मुद्देस्पर्धेसाठी राज्यातून १९ संघांना प्रवेशपहिल्या दिवशी नऊ ,दुसºया दिवशी १० एकांकिका सादर होणार आहेत.१७ रोजी होणार समारोप