शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

एसटीची चाके पुन्हा थांबणार; १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण

By सचिन देव | Published: September 06, 2023 9:37 PM

एसटीची चाके पुन्हा थांबणार : तर उपोषणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

धुळे : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रकारच्या २९ आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यामुळे लाल परिची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या उपोषणाच्या पार्श्भूमीवर एसटी महामंडळाचे  सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश धुळ्यासह राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना  दिले आहेत.

गेल्या वर्षां विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्याने, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापही एसटी महामंडळाने केलेली नाही. त्यामुळे मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी १३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. तत्पूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी बोलावले नाही, तर १३ पासून राज्य भरात एसटी कामगार संघटने तर्फे उपोषण पुकारले जाणार आहे.

तर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मन वळवावे :

या उपोषणात जे चालक किंवा वाहक सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळातर्फे शिस्त भंगाची कारवाई करण्या बाबत आदेश विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसण्यापासून प्ररावृत्त करण्यासाठी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना भेटावे, त्यांना महामंडळाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची व उपोषणात सहभागी झाल्याबद्दल होणाऱ्या  कारवाईची माहिती देण्याबाबत विभाग नियंत्रक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

संबधित संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी यांच्याशी आम्ही त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहोत. उपोषण काळात प्रवाशी सेवेवर परिणाम होऊ नये, म्हणून आम्ही आवश्यक त्या सर्व उपाय योजना करणार आहोत.विजय गीते, विभाग नियंत्रक, धुळे

एसटी महामंडळाने आम्ही मागणी केलेल्या मागण्यांची अद्याप पूर्तता न केल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आमचे ५० हजार सभास्द असून, आम्ही उपोषण सुरू केल्यावर एसटी महामंडळातर्फे  जी कारवाई होऊन त्या कारवाईला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. योगराज पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, जळगाव.

टॅग्स :Bus DriverबसचालकDhuleधुळेStrikeसंप