लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकातील आयसीआयसीआय बँकेचे चोरीला गेलेले एटीएम मशिन मालेगावजवळील धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले़ हे मशिन गॅस कटरने कापले आहे़ घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आपल्या पथकासह रवाना झाले आहेत़ शहरातील अग्रसेन चौकात असलेल्या व्यापार संकुलातील एका गाळ्यात असलेले आयसीआयसीआय बँकेच्या दोन एटीएम मशिनांपैकी एक संपूर्ण मशिनच चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती़ अशा प्रकारची घटना जिल्ह्यात प्रथमच घडली असून माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वान जागेवरच घुटमळत होते़ चोरट्यांनी यातील एका मशिनमधून पैशांची लूट न करता थेट ते मशिनच जमिनीपासून वेगळे करून चोरून नेले. या मशिनमध्ये २२ लाख ४४ हजार ८०० रुपये आणि एटीएम मशिन ३ लाखांचे असा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला होता़ या घटनेनंतर चोरट्यांच्या तपासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ इंदूर, साक्री आणि मनमाड या दिशेने पथकातील काही जणांना रवाना करण्यात आले आहे़ शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी प्रकरणाचा तपास करीत आहेत़
मालेगावजवळ सापडले चोरीला गेलेले एटीएम मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:42 AM
पोलिसांचे पथक रवाना : चोरट्यांचा शोध जारीच
ठळक मुद्देचोरीला गेलेले एटीएम मशिन तुटलेल्या अवस्थेत आढळलेपोलिसांचे पथक मालेगावच्या दिशेने रवाना