वॉर्ड क्रमांक दोनमध्ये गेल्या दीड वर्षांपासून नूतन कॉलनीतील पथदिवे बंद होते. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पथदिवे सुरू करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली होती. अखेर ग्रामपंचायत सदस्या वैशाली विठोबा माळी व महेश राजेंद्र माळी यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
यावेळी सरपंच सोनीबाई भिल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी व महेश माळी यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून विजेच्या तारांना काटेरी झाडांचा पडलेला विळखा मोकळा केला. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या तारा व इतर काम करून पथदिवे सुरू केले. या कामासाठी वीज वितरण कंपनीच्या अभियंता अंजली हिंगमिरे, सुनील पाटील, योगेश सोनवणे, अतुल पाटील, महेंद्र पाडवी यांच्यासह जेसीबी मालक नारायण माळी, विनोद पिंजारी यांचे सहकार्य लाभले.