धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून धुळे तालुक्यातील गोताणे येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी गंगाराम बाबा मंदिराजवळ घडली़ याप्रकरणी दोन्ही गटातील ११ जणांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़यातील एका गटाकडून देवेंद्र गमन मासुळे (२४) याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, ७ मे रोजी ८ ते साडेआठ वाजेच्या सुमारास विनाकारण शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली़ त्याला विरोध केला असता हाताबुक्यांनी मारहाण केली़ लाकडी काठीने पोटासह पाठीवर मारहाण केली़ एवढ्यावरच न थांबता माझ्या पॅन्टच्या खिशात असलेले ४ हजार रुपये रोख काढून घेतले ते परत केले नाही़ या घटनेनंतर देवेंद्र मासुळे याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले़यानंतर शुक्रवारी दुपारी त्याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ याप्रकरणी भटू अर्जुन पाटील, विपूल रतन पाटील, रतन भावराव पाटील, योगेश साहेबराव मोरे, सागर विक्रम बागुल, भूषण सुरेश मिस्तरी (सर्व रा़ गोताणे ता़ धुळे) या संशयितां विरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४०३, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुसऱ्या गटातील भूषण सुरेश मिस्तरी (२१) याने फिर्याद दाखल केली़ मी गावातील कोणत्या मुलीचे नाव घेतले, तु गावात माझी बदनामी का करतो असे विचारल्याच्या कारणावरुन ७ मे रोजी ८ ते साडेआठ वाजेच्या सुमारास मारहाण करण्यात आली़ शिवीगाळ करीत एकत्रित गर्दी गोळा करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली़याप्रकरणी ८ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास देवेंद्र गमन पाटील, भैय्या गमन पाटील, गमन बुधा पाटील, किरण आनाजी पाटील, आनाजी बुधा पाटील (सर्व रा़ गोताणे) या संशयितांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तालुका पोलीस तपास करीत आहेत़गावातील हाणामारी चर्चेचा विषयधुळे तालुक्यातील गोताणे गावात अचानक दोन गटात हाणामारी झाल्याने हा एकच विषय गावात चर्चेचा ठरलेला आहे़ काहिशा छोट्याश्या कारणावरुन अगदी सिनेस्टाईलप्रमाणे दोन गट आमने-सामने आल्याने गावात काही काळ धावपळ उडाली होती़ नेमके काय सुरु आहे, हे समजण्याच्या आतच हाणामारी झाली़ सध्या कोरोना हा एकच विषय चर्चेत असताना आता गावात झालेली दोन गटातील हाणामारी हा एकच विषय चर्चेत आलेला आहे़ ही घटना घडण्यामागे नेमके कारण काय असेल त्याचा परामर्श घेतला जात आहे़
गोताण्यात हाणामारीने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:19 PM