आॅनलाईन लोकमतशिरपूर (जि. धुळे), दि.२९ : मोबाईलमधील अश्लिल फोटो कॉपी करुन ते इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत विवाहितेशी संबंध प्रस्थापित करुन दोन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पतीचा मित्र विकास पाटील व त्याची पत्नी नगीना पाटील यांच्याविरुद्ध बलात्कार आणि ब्लॅकमेलींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत विवाहिता ही सैन्य दलातील जवानाची पत्नी आहे. सैनिकाचा परिवार शहरात राहतो. सप्टेंबर २०१६ मध्ये विवाहितेचा मोबाईल नादुरूस्त झाला. तिने संशयित आरोपी व सैनिक विकास पाटील यास मोबाईल दुरुस्ती करण्यास सांगितले़ पाटील याने या मेमरी कार्डमधील तिचे पतीसोबत असलेले अश्लिल फोटो पाहिले असल्याचे सांगितले व माझ्याशी संबंध ठेव नाहीतर ते फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकीे दिली.त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये विवाहिता घरी एकटी असतांना त्याने बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित करुन अश्लिल फोटो काढले. याबाबत कुणाला सांगितल्यास बदनामीची धमकी दिली.यानंतर विकास व त्याची पत्नी नगिना पाटील यांनी या महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली व २ लाख रूपये देण्याची मागणी केली. अखेर या त्रासाला कंटाळून विवाहितेने घडलेली घटना पतीला कथन केली़ २८ नोव्हेंबर रोजी पिडीत महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन विकास रमेश पाटील व नगिना पाटील यांच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
धक्कादायक.... शिरपूरात सैनिकाच्या पत्नीवर बलात्कार करीत नराधमाने मागितली दोन लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:40 PM
शिरपूर पोलिसात पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी व त्याच्या पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देमोबाईलवरील अश्लिल फोटो इंटरनेटवर टाकण्याची दिली धमकीपीडितेने संशयित आरोपीला दिला होता मोबाईल दुरुस्तीसाठीसंशयित आरोपी पीडितेच्या पतीसोबत सैन्यदलात