धुळे : महिलांची छेड काढणा:या व नागरिकांना शिवीगाळ करून त्रास देणा:या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केली आहे.मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील महिला व तरुणींना काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देतात. रात्री-बेरात्री दारू पिऊन तरुण मुली, स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, माणसे यांना नेहमी शिवीगाळ करतात. कधी-कधी मारहाण देखील करतात. रात्रीच्या वेळी मोटारसायकल व इतर गाडय़ांची तोडफोड करून नुकसान करतात. घरावर दगडफेक करतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता अरेरावीची भाषा करतात. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा. यासंदर्भात देवपूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊन देखील या गावगुंडामध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यांचे नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरूच आहेत. भविष्यात कोणतीही विपरित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी मागणी रफीक शेख उसनोद्दीन, मोहम्मद शेख रफीक, अफजल खाँ, रईस पेंटर, इम्रान खाँ, रईस शेख मेहमुद शेख, कलीम खाँ, भागवद पवार, सलीम रशिद पिंजारी, रहीम खान, रफीक शाह, संजू पवार, ज्ञानेश्वर जगताप, अफसर अली, सुरेश खैरनार आदींनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिकही उपस्थित होते.
महिलांची छेड काढणा:यांचा बंदोबस्त करा
By admin | Published: January 11, 2017 11:50 PM