वसंत कुलकर्णी। लोकमत न्यूज नेटवर्क अल्प भूधारक शेतकरी कुटूंबातील साक्री तालूक्यातील वासखेडीचा भूमीपूत्र महेश सूर्यवंशी याने जुन २०१९ या वर्षाचा नेट परिक्षेत मराठी विषयात अल्प दृष्टी उमेदवारांतून देशात विद्यापीठ अनुदान आयोगाची ज्युनियर रिर्सच फेलोशिप मिळवत जवळपास तेवीसशे विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रंमाक पटकावत ध्येयापुढे अशक्य काहिच नाही हे सिध्द करत असंख्य विद्यार्थ्यांपुढे आदर्श उभा केला आहे़
*प्रश्न: अभ्यासाचे नियोजन कसे केले?उत्तर : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना प्रा.डॉ.म.सु़पगारे, प्रा.डॉ.आशुतोष पाटील सरांनी मला प्रेरणा दिली कि तू करू शकतोस त्या दृष्टीने सरांकडून वेळोवेळी अभ्यासाचे मार्गदर्शन मिळत गेले. विद्यपीठाच्या अभ्यासिकेत सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी दिला. अभ्यासाचे दडपण न घेता अवघड संकल्पना समजून घेत अभ्यास केला.*प्रश्न: भविष्यात काय करण्याची इच्छा आहे?उत्तर : मराठी विषयातच मला करिअर करायचे होते. मातृभाषा म्हणून मराठी विषय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, असा विश्वास आदर्श महाविद्यलाय मराठी विभागाचे विभाग प्रमुख माझे शिक्षक प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे, प्रा.यशवंत कुळकर्णी यांनी व सर्वच शिक्षकांनी उभा केला. पुढे त्याच मार्गावर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत नेट परीक्षेत यश मिळवले. आता पुढे विद्यापीठातच ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य यापैकी एका विषयात संशोधन पीएच.डी. करायची आहे.*प्रश्न: इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता काय सल्ला देशील ?उत्तर : अभ्यास करताना दडपण न घेता आपल्या करिअरविषयी आधीपासून ध्येय निश्चित करायला हवे. हार्ड स्टडी करण्यापेक्षा स्मार्ट स्टडी केल्याने वेळेची बचत करता येऊन जास्तीत जास्त वेळ मूळ विषयाला देता येतो. अवघड विषय समीक्षा करत समजून घेतल्यास यश नक्कीच मिळवता येते. *आई-वडीलासंह शिक्षकांचा आदर्श*घरी वडील रावसाहेब हिराजी सूर्यवंशी अल्प भूधारक शेतकरी आहेत. आई शकुंतलबाई मोल मजुरीची कामे करून घराचा उदरनिर्वाह चालवतात. दोन विवाहित बहिणी असून लहान भाऊ हर्षल सूर्यवंशी हा वडिलांना शेतीच्या कामात मदत करतो बारावीत असताना वडील पक्षाघाताने आजारी पडल्यावर आई व लहान भावाने नेहमी शिक्षणासाठी प्रेरणा दिली आहे. शिक्षकांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. लहान भाऊ हर्षलच्या सहकार्याशिवाय हे सगळे मला शक्यच झाले नसते. महेशचे प्राथमिक शिक्षण हे वासखेडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात घेतले आहे़ पुढे प्राध्यापक म्हणून करिअर करण्याचा मानस असून वक्तृवाबरोबर गायनाचा देखील छंद आहे़ या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे़
अभ्यासाचे दडपण न घेता विषयाशी निगडीत मुळ संकल्पना समजून घेत स्मार्टस्टडी करत अभ्यासाला भावाचीसाथ मिळाली- महेश सुर्यवंशी