साक्री : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.त्याबाबत जनजागृतीसाठी शनिवारी येथील सी.गो. पाटील महाविद्यालयातर्फे मतदार जागृती रॅली काढण्यात आली.या प्रसंगी येथील तहसीलदार संदीप भोसले, निवडणूक नायब तहसीलदार विनोद ठाकूर, प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य प्रा.अनंत पाटील, सिनेट सदस्य डॉ.संजय सोनवणे, नोडल आॅफिसर डॉ.लहू पवार, डॉ.एस.एस. पाटोळे, प्रा.इम्रान पठाण, प्रा.ज्योती फुलपगारे, कॅम्पस अॅम्बेसॅडर निकेतन अहिरराव आदी उपस्थित होते.यावेळी तहसीलदार भोसले व प्राचार्य डॉ.अहिरे यांनी नवमतदारांना नावनोंदणीसह आपले नाव मतदार यादीत आले किंवा नाही याची खात्री करावी. परिसरातील निरक्षर मतदारांना याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मदत करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयापासून शहरात मतदार जागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
साक्री शहरात विद्यार्थ्यांची जागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:05 PM