लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरात शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून येणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गरीब पालकांचे मुलेमुली परिवहनच्या बसने ये-जा करत असतात. मात्र साक्री आगारातील सायंकाळच्या बस वेळेवर सुटत नसल्याने लहान बालकांना घरची ओढ असतानाही बस नसल्यामुळे हिरमोड होवून आगारातच बसावे लागते. तसेच आगारात हिंडतांना अपघाताची शक्यता असते.साक्री आनंदपाडा ही सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी बस छडवेल पखरुण येथे गावात येते नंतर पुढे जाते. कावठे, अष्टाणे, छडवेल या गावातील बहुसंख्य विद्यार्थी या बसने ये-जा करतात मात्र धुळ्याहून सदर बस वेळेवर येत नसल्याने उशिरा लागते. यामुळे लहान विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना कोंबून भरले जाते. स्वतंत्र छडवेल पखरुण बसची मागणी करुनही साक्री आगाराकडून उपलब्ध केली जात नाही. भविष्यात कोंबून भरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे काही झाल्यास त्यास एस.टी. प्रशासन जबाबदारी स्वीकारेल का? असा प्रश्न छडवेल, अष्टाणे, कावठे या गावातील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. यासाठी साक्री आगार व्यवस्थापकांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
वेळेवर बस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:35 PM