धुळे : माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना मंगळवारी नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला आहे. लाच प्रकरणात त्यांच्यावर काय कारवाई करावयाची याबाबत राज्य शासनालाच अधिकार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.शहरातील जेल रोडवरील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात 2 लाख 30 हजारांची लाच स्वीकारताना प्रवीण पाटील व किशोर पाटील पकडण्यात आले आहे. दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अटळ आहे. परंतु त्यांच्यावर कारवाईचे अधिकार राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला आहेत. कारवाईच्या संदर्भातील राज्य शासनाचे आदेश अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.शैक्षणिक संस्थेमध्ये कायम आरक्षित, खुल्या व इतर जागेत नियुक्त्या करताना नियमांचा भंग झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातीलच एका कर्मचा:याला ही लाच मागण्यात आली होती.24 मार्चर्पयत पोलीस कोठडी़़़शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना बुधवारी दुपारी धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आल़े न्यायालयाने दोघांना 24 मार्चर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़
लाच प्रकरणाचा अहवाल राज्य शासनाला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 11:51 PM