शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लॉकडाऊनचा असाही परिणाम मद्यविक्रीच्या महसुलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 10:51 PM

एप्रिल ते जुलै महिन्यातील स्थिती

धुळे : कोरोनाच्या अनुषंगाने सुरुवातीला सर्वत्र लॉकडाऊन होते़ त्यानंतर स्थिती पूर्ववत सुरु झाल्यानंतर अनलॉक करुनही मद्यविक्रीच्या महसुलात वाढ न होता घटच झाली आहे़ एप्रिल ते जुलै महिन्यात देशी, विदेशी, वाईन आणि बिअर अशा चारहीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत महसूल घटला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी दिली़२०१९-२० मध्ये एप्रिल महिन्यात देशी दारुतून २ लाख १५ हजार ५७ रुपये, मे मध्ये २ लाख ६९ हजार ६९० रुपये, जून मध्ये २ लाख ४४ हजार २९९ रुपये, जुलै महिन्यात २ लाख २५ हजार २८९ रुपये असे एकूण ९ लाख ५४ हजार ३३५ रुपयांचा महसूल जमा झाला होता़ विदेशी दारुतून एप्रिल महिन्यात १ लाख २४ हजार २४ रुपये, मे महिन्यात १ लाख ६३ हजार ४६७ रुपये, जून महिन्यात १ लाख ४० हजार ४७२ रुपये, जुलै महिन्यात १ लाख ३७ हजार ४६२ रुपये असे एकूण ५ लाख ६५ हजार ४२५ रुपये महसूल जमा झाला होता़ वाईन दारुतून एप्रिल महिन्यात २ हजार १०७ रुपये, मे महिन्यात २ हजार २६६ रुपये, जून महिन्यात २ हजार ३९० रुपये, जुलै महिन्यात २ हजार १५७ रुपये असे एकूण ८ हजार ९२० रुपये महसूल जमा झाला होता़ तसेच बिअर या प्रकारातून एप्रिल महिन्यात १ लाख ९६ हजार २२२ रुपये, मे महिन्यात २ लाख ७९ हजार ४१२ रुपये, जून महिन्यात २ लाख १८ हजार १५४ रुपये, जुलै महिन्यात १ लाख ४२ हजार १३९ रुपये असे एकूण ८ लाख ३५ हजार ९२७ रुपये महसूल जमा झाला होता़२०२०-२१ मध्ये एप्रिल महिन्यात सर्वच बंद असल्यामुळे एक रुपयाही महसूल जमा झालेला नव्हता़ त्यानंतर थोडी सूट मिळाल्यामुळे मे महिन्यापासून महसूल जमा होण्यास सुरुवात झाली़ त्यानुसार, देशी दारुतून मे मध्ये १ लाख २६ हजार २९६ रुपये, जून मध्ये १ लाख ५६ हजार ७३७ रुपये, जुलै महिन्यात १ लाख ५७ हजार २१८ रुपये असे एकूण ४ लाख ४० हजार २५१ रुपयांचा महसूल जमा झाला़ विदेशी दारुतून मे महिन्यात ८१ हजार १२९ रुपये, जून महिन्यात १ लाख १२ हजार २८३ रुपये, जुलै महिन्यात १ लाख १६ हजार ८८९ रुपये असे एकूण ३ लाख १० हजार ३०१ रुपये महसूल जमा झाला़ वाईन या दारुतून मे महिन्यात ९४९ रुपये, जून महिन्यात १ हजार ७५२ रुपये, जुलै महिन्यात १ हजार ७९५ रुपये असे एकूण ४ हजार ४९६ रुपये महसूल जमा झाला़ बिअर दारुतून मे महिन्यात १ लाख १७ हजार ४३ रुपये, जून महिन्यात १ लाख ३७ हजार ६१४ रुपये, जुलै महिन्यात १ लाख २२ हजार ९१२ रुपये असे एकूण ३ लाख ७७ हजार ५६९ रुपये महसूल जमा झाला़

टॅग्स :Dhuleधुळे