धुळे :शिरपूर तालुक्यातील जामनपाणी पोस्ट बोराडी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. सहाबाई निमड्या पावरा असे या मुलीचे नाव आहे.
रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लाकडाला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची घटना लक्षात येताच तिचे काका परशुराम सीताराम पावरा यांनी खासगी वाहनाने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे तिला दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.